top of page

Past Events

विकासमित्र प्रकल्प, ता. वेल्हे

दि. १५/९/२०२१ रोजी ७ माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवले गेले. गणेशोत्सवामध्ये ज्ञान प्रबोधिनी युवक विभागातर्फे गेली १५ वर्षे हे प्रदर्शन पुण्यामध्ये भरवले जाते. यावर्षी हे प्रदर्शन हलते असणार असल्याने विकासमित्र प्रकल्पातल्या शाळांमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन केले गेले. आणखी वाचा

     छोटे सायंटिस्ट्स उपक्रम २०२१-२२ 

छोटे सायंटिस्ट्स उपक्रमा-अंतर्गत समस्या परिहार स्पर्धा २०२१-२२ मार्च महिन्यात दूरस्थ पद्धतीने  घेण्यात आली.या स्पर्धेत मुळशी मावळ तालुक्यातील २० शाळेतील इ. ८वी व इ. ९वी तील निवडक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. इ. ८वी साठी ' टाकीतील गाळ काढणारे उपकरण' तयार करणे व ९वी साठी तुमच्या परिसरातील होणारे ध्वनी प्रदूषण ही समस्या व त्यावरील उपाय या विषयावर  पोस्टर सादरीकरण तयार करणे या कृती दिल्या होत्या. १२ व १६ मार्च २०२२ रोजी समस्या परिहार स्पर्धा दूरस्थ पद्धती  घेतली गेली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपकरणांचे आणि तयार केलेल्या पोस्टर चे सादरीकरण दूरस्थ  पद्धतीने केले. स्पर्धे-अंतर्गत   इ.८वी व इ.९वी तील प्रत्येकी प्रथम व द्वितीय क्रमांक काढण्यात आले.विद्यार्थी प्रतिसाद उत्तम दिसून आला. तसेच शाळेचे व विज्ञान शिक्षकांचे सहकार्य लाभले.

WhatsApp Image 2022-03-18 at 12.07.28 PM.jpeg

दहावीच्या विद्यार्थ्यासाठी निरोप/शुभेच्छा समारंभ कार्यक्रम

दिनांक : २७ फेब्रुवारी २०२२ रोजी १०वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रकाश सोमाणी, ओमकार बाणाइत तसेच भारत फोर्जचे स्वामी शिवानंद  इ. उपस्थित  होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देत या उपक्रमातून  मिळवलेले ज्ञान आणि कौशल्यांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतः तयारी करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .  विद्यार्थ्यांचा तीन वर्ष प्रज्ञा विकास कार्यक्रमात घडलेला एकूण प्रवास आणि त्यामुळे झालेले चांगले बदल यांचे विशेष मनोगत त्यांनी व्यक्त केले. 'प्रज्ञा विकास कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे  आम्हाला उत्तम मार्गदर्शन आणि नवनवीन गोष्टी करण्याची तसेच शिकण्याची संधी मिळाली आणि याचा उपयोग पुढे भविष्यात नक्की करू 'असे सांगितले. प्रज्ञा विकास कार्यक्रम व   मार्गदर्शक  ताई व दादांचे आभार हि  व्यक्त केले. विद्यार्थ्यांना  अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप केला.यावेळी एकूण  दहावीचे १५ विद्यार्थी, तसेच नवीन तुकडीचे, गायरान वस्ती कम्युनिटी सेंटरचे 30 विद्यार्थी व इतर सहकारी  सदस्य उपस्थित होते.

    भारत फोर्ज आणि ज्ञान प्रबोधिनी यांच्या

    संयुक्तविद्यमाने 'अनुभव शाळा' प्रकल्प २०२२

​अनुभव  शाळाअतर्गत झालेल्या प्रकल्पात १९ फेब्रुवारी रोजी 'छत्रपती शिवाजी महाराज जयंती' साजरी केली. यामध्ये पोवाडे,भाषण , महाराजांचा पाळणा यावर  नृत्य सादर केले.उत्साहाने शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. 

२८फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञानदिना निमित्ताने विज्ञानाचे प्रयोग/प्रकल्प मुलांनी लेखन करून प्रत्यक्ष कृती  केल्या त्यामध्ये वस्तुचे आकारमान (पाण्यात विरघळणारे पदार्थ),चुंबकत्व,पाण्याचे शुद्धीकरण,न्यूटनची तबकडी, स्ट्रीट लॅम्प ज्वालामुखी, उष्णतेचे वहन,इ. प्रयोग मुलांनी केले.

वाचन दिन सप्ताह -विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन सप्ताह साजरा करण्यात आला. विद्यार्थ्याना विविध पुस्तके हाताळायला दिली. यावेळी पुस्तक बाहेर मांडून ठेवली. कुठलेही पुस्तक विद्यार्थी घेवून वाचू शकत होते.

10 nirop.png
WhatsApp Image 2022-03-22 at 2.56.43 PM.jpeg
bottom of page